MNS आणि Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेत झालेल्या वादावर Shahaji Bapu Patil यांचं मोठं विधान

Shahaji Bapu Patil News Today: ठाण्यात ठाकरे गट आणि मनसेमध्ये झालेल्या वादावर शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनसे आणि उबाठा यांच्या वादात आता शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil ) यांनी उडी घेतली आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या गाड्यांवर सुपार्‍या टाकल्यानंतर तुमच्या गाड्यांवर नारळच पडतील, असा खोचक टोला सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने राज्यात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे. तुम्ही जर दुसऱ्यांच्या गाडीवर सुपार्‍या फेकत असाल तर त्यांनी बघत बसावे का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे हे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत असल्याचा आरोप केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com