New Education Policy : नव्या शैक्षणिक वर्षात शाळा उन्हाळ्यातच सुरू होणार? पालकांसाठी महत्वाची अपडेट | VIDEO

Sukanu Committee : नव्या शैक्षणिक वर्षात अनेक शैक्षणिक बदल केले जाणार आहेत. याबद्दलचा अहवाल सुकाणू समितीने राज्य सरकारला सादर केला आहे.

राज्यात आता शाळांची घंटा ही १ एप्रिलपासूनच वाजण्याची शक्यता आहे. दरवर्षी १३ जुनला भरणारी शाळा आता नवीन शैक्षणिक वर्षात १ एप्रिलला भरवण्याचा निर्णय सुकाणू समितीने घेतला आहे. सीबीएसई पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची शिफारस देखील राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच शाळा उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक वर्षाची सुरुवात सध्या जून महिन्यापासून होते. ते आता एप्रिल महिन्यापासून करण्याचा निर्णय सुकाणू समितीमार्फत घेण्यात आलेला आहे. शैक्षणिक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवण्यासाठी शासन तयार आहे. राज्य शासन लवकरच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल. शैक्षणिक धोरण 2020 आणि त्याची अंमलबजावणी याचा अभ्यास करण्यासाठी शासनामार्फत सुकाणू समिती गठीत करण्यात आली होती. या गठीत केलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. यामधील सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे शैक्षणिक सत्र 1 एप्रिल पासून करण्यात यावं ही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com