Video
Sanjay Raut On Vishal Patil | विशाल पाटील उमेदवारी मागे घेणार? राऊत यांचे मोठे विधान
आघाडीतले सगळे नेते एकत्र आले आहेत सगळे सोबत आहेत असे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले. तसेच विशाल पाटील हे आमच्याच कुटुंबातले एक आहेत.
सांगली:
आघाडीतले सगळे नेते एकत्र आले आहेत सगळे सोबत आहेत असे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले. तसेच विशाल पाटील हे आमच्याच कुटुंबातले एक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि असे अनेक ठिकाणी झालंय. पण विशाल पाटील माघार घेतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. नागपूरसह भंडारा-गोंदिया, विदर्भात आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीला यश मिळेल असेही राऊत म्हणाले. तसेच कोकणात एकतर्फी सामना होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात आमच्या विरोधात नारायण राणेच हवे होते असेही राऊत म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.