Video: राऊतांच्या आडून जयंत पाटलांची खेळी? विशाल पाटलांसमोरच विलासराव जगपात यांचं सांगलीत मोठं वक्तव्य!

Sangli Vishal Patil News Today: सांगलीतून वसंतदादा घराणं संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने घातल्याचा आरोपही त्यांनी केला.

सांगली : सांगलीचे काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील असल्याचा सनसनाटी आरोप माजी आमदारांनी केलाय. माजी आमदार विलासराव जगताप यांनी जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ते सांगलीमध्ये बोलत होते. सगळ्या खेळी संजय राऊत यांच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी केल्या, असं जगपात यांनी म्हटलंय. सांगलीतून वसंतदादा घराणं संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने घातल्याचा आरोपही त्यांनी केला. जत मध्ये काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत एक जाहीर बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना विलासराव जगपात यांनी जयंत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com