Sangli News : सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई? काय आहे कारण, पाहा Video

Warrant Of Seizure : ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीचं वॉरंट काढण्यात आलं आहे.

सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची टांगती तलवार आहे. ठेकेदाराच्या थकीत बिलासाठी सांगली न्यायालयाकडून जप्तीची वॉरंट जारी करण्यात आल आहे. जप्तीचा वॉरंट घेऊन न्यायालयाचे कर्मचारी व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खुर्ची, टेबलसह वाहन व इतर साहित्य जप्त करण्याचा वॉरंट सांगली न्यायालयाकडून बजावण्यात आला आहे. 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील श्री प्रोडक्ट कंपनीकडून सांगली जिल्हा परिषदेला वॉटर प्युरिफायचा पुरवठा करण्यात आला होता. सांगली जिल्हा परिषदेकडून संबंधित ठेकेदाराचे 20 लाखांचे बिल थकवण्यात आलं होतं. श्री प्रोडक्ट कंपनीकडून जिल्हा परिषदेच्या विरोधात सांगली न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यासंदर्भात हे जप्तीचं वॉरंट काढण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com