VIDEO: Worli Hit & Run प्रकरणी Sandip Deshpande यांची संतप्त प्रतिक्रिया

Sandip Deshpande News: चालकाने पळून जाण्याच्या नादात या महिलेला फरफटत नेले, वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणी संदीप देशपांडे यांचा मोठा दावा

वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणी शिंदे गटाचे राजेश शहा यांना पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. वरळीमध्ये भरधाव गाडीने दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणावेळी शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सदर प्रकार घृणास्पद असल्याचं ते म्हणाले, गाडीचा ब्रेक वेळीच मारला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता असं संदीप देशपांडे म्हणाल. चालकाने पळून जाण्याच्या नादात या महिलेला फरफटत नेले तो जर वेळीच थांबला असता तर महिलेचा जीव वाचला असता असा दावा देशपांडे यांनी केला आहे. या संपुर्ण प्रकरणाला ३०२ गुन्हा लावला पाहिजे अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. आरोपीचं पॉलिटिक्स कनेक्शन असले तरीही कारवाई झाली पाहिजे असं देशपांडे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com