Sandipanrao Bhumre News | संभाजीनगरात दोन शिवसैनिकांमध्ये लढत, खैरे वि. भुमरे रंगणार सामना

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी लढत होणार आहे.

संभाजीनगर : संभाजीनगर लोकसभा ( Sambhajinagar Lok Sabha) मतदारसंघातून शिंदे गटाकडून संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी लढत होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून चंद्रकातं खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पराभव केला होता. आता संभाजीनगरमध्ये जलील, खैरे आणि भुमरे अशी तिरंगी लढत होणार आहे. 25 एप्रिलला संदीपान भुमरे आपला उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com