RTE Admissions : आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, १ लाख ८ हजारापेक्षा जास्त जागा | Marathi News

Right To Education : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. २७ जानेवारीपर्यंत पालकांना यासाठी अर्ज करता येणार आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून (दि. १४) सुरू करण्यात येत आहे. राज्यभरातील १ लाख ८ हजारांपेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून पालकांना १४ ते २७ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

आरटीई पोर्टलवरील आकडेवारीनुसार राज्यभरातील ८ हजार ८४९ शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकूण १ लाख ८ हजार ९६१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात उपलब्ध असतात. यंदाही पुणे जिल्ह्यातील ९५१ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यात १८ हजार ४५१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com