VIDEO: Worli Hit and Run प्रकरणी Rohit Pawar यांचा सरकारवर गंभीर आरोप

Rohit Pawar On Worli Hit and Run Case: वरळी Hit and Run प्रकरणी आरोपी मिहीर शहा याला अटक, रोहित पवार यांचा सरकारवर गंभीर आरोप

वरळी मध्ये भरधाव गाडीने एका महिलेला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. यादरम्यान प्रकरणातली आरोपी मिहीर शहा याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ४८ तास तो मुलगा सापडणार नाही हे आम्ही बोललो होतो, त्याच्या रक्तात दारु किंवा अन्य सेवण केलेल्या वस्तुचा अंश सापडू नये म्हणून सरकारने, नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी त्याला लपवून ठेवलं असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. आरोपी मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती, राजेश शहा हे शिंदे गटाचे उपनेते असून त्याला पदावरुन काढायला एकनाथ शिंदे यांना चार दिवस लागले, जरी त्यांनी शहाला पदावरुन काढला असला तरी त्याला पक्षातून काढलं नाही असं म्हणत रोहित पवार यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com