Pune Rain News | राज ठाकरेंची सभा आणि पावसाचं सावट
Pune Rain News | पुण्यात पावसाने जोरदार बॅटिंग केलीय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पावसाने अनेक दिग्गजांच्या सभेवर पाणी फेरलंय. राज ठाकरेंची आज पुण्यात सभा होती पण ती सभा होण्याआधीच पावसाने पुण्याला चांगलंच झोडपलंय. मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा होती. त्या सभेवर आता पावसाचं सावट आलंय. पुण्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे. सभा घेण्यावरती मनसेचे कार्यकर्ते ठाम आहेत. पाऊस कमी झाला असल्याने सभेची तयारी मनसेकडून सुरू. मात्र पाऊस वाढला किंवा अचानक जास्त पाऊस आला तर मात्र सभा रद्द करण्याशिवाय पर्याय नाही असं चित्र दिसतंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.