Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, भाऊबीज साजरी करण्यासाठी जयजयवंती यांच्या घरी पोहचले; पाहा VIDEO

Bhaubij Celebration: ठाकरे बंधू ९ व्यांदा एकत्र आले आहेत. आज भाऊबीजनिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बहीण जयजयवंती देशपांडे यांच्या घरी आले आहेत. ठाकरे बंधू सहकुटुंब याठिकाणी पोहचले असून सर्वजण आनंदी दिसत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र आले आहेत. भाऊबीजनिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. राज ठाकरे भाऊबीज साजरी करण्यासाठी बहीण जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या घरी सहकुटुंब दाखल झाले आहेत. तर उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब बहिणीच्या घरी पोहचले आहेत. बऱ्याच वर्षांनंतर जयजयवंती या भाऊबीजनिमित्त दोन्ही भावांचे एकत्र औक्षण करणार आहेत. सहकुटुंब एकत्रित आल्यामुळे ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे आता राजकीय वर्तुळात त्यांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा देखील होऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील भाऊबीज साजरी करण्यासाठी शिवतीर्थवर जाणार आहेत. आजचा दिवस आमच्यासाठी खूपच आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी वाढल्या आहेत. ३ महिन्यात ९ वेळा ठाकरे बंधू यांची भेट झाली. पण अद्याप त्यांनी युतीबाबतची घोषणा केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com