Nilesh Lanke यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी Rahul Gandhi लावणार हजेरी

निलेश लंकेंचा अर्ज भरण्यासाठी खुद्द राहुल गांधीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यांच्याशी बोलणं देखील झालं असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलंय.

निलेश लंकेंचा अर्ज भरण्यासाठी खुद्द राहुल गांधीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यांच्याशी बोलणं देखील झालं असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलंय. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी 22 जणांनी 44 अर्ज घेतलेत. यामध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रतिनिधीने तसेच राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रतिनिधीने चार अर्ज घेतल्याचं सांगितलं जातं. तर 23 एप्रिलला हनुमान जयंती दिवशी महाविकास आघाडीचे वतीने निलेश लंके अर्ज भरू भरण्याची शक्यताय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com