Pune News : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, बसमध्ये CCTV आणि महिला अटेंडंट हवी |VIDEO
पुण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी खासगी व शालेय बससेवेसाठी नवीन नियम लागू केले आहेत. आता शहरातील प्रत्येक खासगी व शालेय बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं आणि महिला अटेंडंट असणं बंधनकारक असणार आहे. हा निर्णय महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
यामुळे बसमधील गैरप्रकार, छेडछाड, अथवा अनुचित वर्तनावर नियंत्रण मिळवता येणार आहे. चालक, कंडक्टर आणि क्लिनर यांची पोलिस पडताळणी केली जाणार आहे.तेसेच पालकांनीसुध्दा शालेय बसमध्ये सीसीटीव्ही महिला अटेंडंट नसल्यास पोलिसांना कळवाव. पोलिसांकडून या नव्या नियमांची काटेकोरपणे आणि शिस्तबद्ध तपासणी केली जाणार असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.