Pune Rain News Today: पुणे शहरात मुसळधार! नांदेड सिटी रोडवर पाणीच पाणी, वाहतूक मंदावली

Pune News Today: जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा अनेकठिकाणी खोळंबा झाला. दरम्यान, पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील रोडवर पाणी जमा झालं होतं.

Pune Unseosonal Rain News Today: पुणे शहरात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी जमा झालं. त्यामुळे पुण्यातील वाहतूक मंदावली. जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा अनेकठिकाणी खोळंबा झाला. दरम्यान, पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील रोडवर पाणी जमा झालं होतं. त्यामुळे गाड्या चालवताना मोठी कसरत पुणेकरांना करावी लागली. राज्यभरात पुढचे काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यात झालेल्या अवकाळी पावसाने पुणेकरांची एकच तारांबळ उडाली. दुसरीकडे नागपूर, चंद्रपूर, हिंगोलीसह छत्रपती संभाजीनगरमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com