Pune News: पुणेकरांच्या खिशाला कात्री! मिळकतकरात १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता | VIDEO

Pune Property Tax News: पुणेकरांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. आता मिळकतकरात दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता पुणेकरांच्या खिशाला कात्री लावणारा लागण्याची शक्यता आहे. लवकरच मिळकत दरात वाढ होण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिळकतकरात वाढ न झाल्याने महापालिका प्रशासनाने 10 टक्के करवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. तो स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलाय. त्यावर आज आयुक्त निर्णय घेणार आहेत. मात्र, अंतिम निर्णय 20 फेब्रुवारीपूर्वी मुख्यसभेत घ्यावा लागणार आहे. दरम्यान, भाजप सत्तेत येण्याच्या पार्श्वभूमीवर पहिलाच निर्णय करवाढीचा असणार की दिलासा देणारा, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com