VIDEO: पुण्यात महाविकास आघाडी आक्रमक, ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करणार मेट्रोचे उद्घाटन

Pune Mahavikas Aghadi Protest:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी पुणे दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यादरम्यान ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करणार होते. पण पावसामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. हा दौरा रद्द झाल्यामुळे पुण्यातील भुयारी मेट्रो सुरू झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकास आघाडी मेट्रोचे उद्घाटन करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्टेशन परिसरात महाविकास आघाडीकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहेत. पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अशाप्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात येत आहेत.

महाविकास आघाडीच्या या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, संजय मोरे, मोहन जोशी, रवींद्र धंगेकर सहभागी झाले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्टेशनवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाविकास आघाडीने आज भुयारी मेट्रो सुरू करण्याचा सरकारला इशारा दिला होता. त्यानुसार मविआने आज ११ वाजता आंदोलनाला सुरूवात केली. मोठ्या संख्येने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्टेशनजवळ जमा झाले आहेत.

दरम्यान, आंदोलन करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी पुणे पोलिस आयुक्तांनी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्याची पुणे पोलिस आयुक्तांकडून विनंती करण्यात आली. 'मेट्रोच्या उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर झाल्यामुळे आंदोलन मागे घ्यावे. कुणीही कायदा हातात घेऊ नये.', असे त्यांनी सांगितले. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी फोनवरून संवाद केला. मात्र माविआ नेते आंदोलन करण्यावर ठाम होते. नुकताच त्यांनी आंदोलन देखील सुरू केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com