Pune Crime News | पुण्यात झालेल्या गोळीबाराच्या आधीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती

Pune Crime Today News |पुण्यात झालेल्या गोळीबाराच्या आधीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुमकर चौक परिसरात आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एक व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या गणेश गायकवड (रा. वारजे) असे त्याचे नाव आहे.

पुणे : पुण्यात अवघ्या दोन दिवसांत तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुमकर चौक परिसरात आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एक व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. गणेश गायकवड (रा. वारजे) असे त्याचे नाव आहे. माचीस मागीतल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या वादाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजता गणेश हा दारू घेण्यास नवले ब्रिज येथे चैतन्य बार ठिकाणी आला. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपीही जमले होते. त्याने सहज माचीस आहे का विचारले आणि यावरून त्यांच्यात वाद झाले. याच वादातून आरोपीने गोळी झाडली. ती गोळी गणेश याच्या खांद्याला लागली यात तो जखमी झाला. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com