Pune: पुण्यात एटीएसची मोठी कारवाई, IT इंजिनिअरला अटक; दहशतवाद्यांशी कनेक्शन?

Pune ATS Big Action: पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. एटीएसने मोठी कारवाई केली आहे. कोंढवा परिसरातून एका आयटी इंजिनिअर तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाचे दहशतवादी संघटनेसोबत कनेक्शन असल्याचे म्हटले जात आहे.

पुण्यामध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातून जुबेर हंगरगेकर नावाच्या एका उच्चशिक्षित आयटी इंजिनियरला एटीएसने अटक केली. त्याच्यावर बंदी घातलेल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 'आरोपी जुबेर हंगरगेकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे'. जुबेर एका आयटी कंपनीत लाखोंच्या पॅकेजवर काम करत असून, त्याच्या घरातून बॉम्ब बनवण्याची माहिती आणि एके-47 रायफल चालवण्यासंबंधी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. तो तरुणांना कट्टरतावादाकडे वळवण्यासाठी प्रवृत्त करत होता का आणि त्याच्या संपर्कात आणखी किती जण होते, याचा तपास आता एटीएस करत आहे. न्यायालयाकडून त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com