Praful Patel News: अजित पवार गटाच्या वाट्याला केंद्रीय मंत्रिपद, प्रफुल पटेल घेणार शपथ

महायुतीमध्ये अजित पवार गटाला केंद्रात एक मंत्रिपद मिळणार आहे. प्रफुल पटेल उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला राज्यात एकच जागा मिळाली आहे. तरी अजित पवार गटाच्या वाट्याला एक मंत्रिपद आले आहे. प्रफुल पटेल केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतील असे जवळपास निश्चित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रफुल पटेल यांना ईडीकडून दिलासा मिळाला होता. ईडी पटेल यांची १८० कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त करणार होती. आता ही कारवाई मागे घेत पटेल यांना दिलासा मिळाला होता. आता पटेल ९ जूनला मंत्रिपदाची शपथही घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com