Pimpri : पिंपरीत वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती, आणखी एक हुंडाबळी | VIDEO

Harassment Tragedy in Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा हुंडाबळीची हृदयद्रावक घटना घडली आहे. सासरी होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून किरण या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा हुंडाबळीची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.या प्रकारामुळे समाजात संतापाचं वातावरण झाले आहे. पाच लाख रुपये रोख रक्कम आणि मोटरसायकलच्या मागणीसाठी सासरी होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून २६ वर्षीय किरण आशिष दामोदर या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही धक्कादायक घटना १७ जुलैच्या मध्यरात्री पिंपरीतील त्यांच्या राहत्या घरी घडली. किरणच्या पती आशिषकडून सतत मानसिक आणि आर्थिक छळ होत होता. दररोजच्या त्रासाला आणि मारहाणीला कंटाळून किरणने टोकाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे किरणचा दीड वर्षांचा चिमुकला आता मातृछायेपासून वंचित झाला आहे.

किरणच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपी पतीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com