VIDEO : पंढरपुरात तिरंगी फुलांनी सजला विठूरायाचा गाभारा
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आज देशभर साजरा केला जात असतानाच, आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही तितक्याच देश भक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिरवा ,पांढरा आणि केशरी या तीन रंगाच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली. यासाठी झेंडू,तुळस आणि गुलछडी या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे. तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्ती बरोबर देशभक्तीचा माहोल तयार झाला आहे. देवाचे प्रवेश द्वार, चौखांबी,सोळखांबीसह मंदिरात फुलांची सजावट केली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठलाला आज खास तिरंग्याचा पोशाख देखील परिधान करण्यात आला आहे. हिरव्या रंगाचे धोतर आणि केशरी रंगाचा अंगरखा आणि गळ्यात पांढरे उपरणे असा तिरंगी पोषाख केला आहे.
रूक्मिणी मातेला ही गुलाबी रंगाची साडी आणि तिरंगी उपरणे परिधान केले आहे.तिरंगी पोषाखामुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. देवाचे नटलेले हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.