Pandharpur Vitthal Rukmini News : विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदनउटी पूजेची भक्तिभावाने सांगता, मंदिर समितीला ३५ लाखांचे उत्पन्न|VIDEO

Pandharpur Mandir : ७६ दिवस चाललेल्या चंदनउटी पूजेत ९५ किलो चंदनाचा वापर करण्यात आला आहे. या चंदनउटी पूजेतून मंदिर समितीला सुमारे ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तब्बल ७६ दिवस चाललेल्या चंदनउटी पूजेची मोठ्या भक्तीभावाने सांगता करण्यात आली. दरवर्षी गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत ही परंपरा जपली जाते. वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दररोज दुपारी चंद्रवटी पूजा होते. यंदा चंदनउटी पूजेसाठी तब्बल ९५ किलो चंदनाचा वापर करण्यात आला आहे. चंदनउटी पूजेच्या माध्यमांतून मंदिर समितीला सुमारे 35 लाख 13 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. देशभरातून आलेल्या भाविकांनी या पूजेमध्ये सहभाग घेतला. चंदनाचा सुगंध आणि विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाउन निघाला होता. ही पारंपरिक पूजा श्रद्धा, सेवा आणि सातत्याचा अद्वितीय संगम मानली जाते.

विठ्ठल आणि श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पुजा सदस्या ॲड माधवी निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सदस्य ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com