Baloch Army Attack: पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा जबर फटका, बलुच बंडखोरांचा IED स्फोट; १५ सैनिक ठार

Balochistan Conflict: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. त्याचवेळी बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी पुन्हा पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. याचदरम्यान बलुचिस्तानमध्येही बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्यावर दुसऱ्यांदा जोरदार हल्ला केला. बलुच लिबरेशन आर्मीने २४ तासांत १५ पाकिस्तानी सैनिक ठार केल्याचा दावा केला आहे. या दुहेरी धक्क्यामुळे पाकिस्तानची अडचण वाढली असून त्याला दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने बोलानमधील माछकुंड परिसरात पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर भीषण हल्ला केला. बीएलएच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने रिमोटच्या मदतीने आयईडी स्फोट घडवून वाहन उडवले. या स्फोटात १५ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी सैन्य आपले मिलिटरी ऑपरेशन सुरू करण्याच्या तयारीत असतानाच बलुच बंडखोरांनी जोरदार हल्ला चढवला. यापूर्वीही बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर अनेकदा हल्ले केले असून, या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com