Special Report: कांदा खरेदीत महाघोटाळा? व्यापारी-अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींची लूट?

नाशिकमध्ये एनसीसीएफची 1 लाख टन कांदा खरेदी संशयाच्या भोव-यात आलीय. व्यापारी आणि अधिका-य़ांच्या अभद्र युतीतून नाशिक कोट्यवधींचा कांदा खरेदी घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

शेतक-याला सर्वाधिक रडवतो तो कांदा...याच बेभरवशाच्या कांद्याला भरवशाचा दर मिळावा यासाठी केंद्रानं नाफेड आणि एनसीसीएफ अशा दोन संस्थांची निर्मिती केली. मात्र गेल्या एनसीसीएफनं केलेली तब्बल 1 लाख टन कांदा खरेदी संशयाच्या भोव-यात सापडलीय. फेडरेशन म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना आठवड्यात केवळ 1200 टन कांदा खरेदी करण्याची मर्यादा असताना एवढी 1 लाख टन कांदा खरेदी कशी केली असा प्रश्न निर्माण झालाय. कारण फेडरेशनच्या नावाखाली केलेल्या या खरेदीतून व्यापारी आणि अधिका-यांनी हजारो कोटींचा मलिदा लाटल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com