OBC Reservation : ओबीसी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

Jalna News : वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. धुळे-सोलापूर महामार्ग या आंदोलकांनी अडवला आहे.

वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. धुळे-सोलापूर महामार्ग या आंदोलकांनी अडवला आहे.

एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. तर दुसरीकडे वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेत धुळे - सोलापूर महामार्ग अडवला आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तर आता त्यांचं उपोषण स्थगित होताच ओबीसी आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. यावेळी हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत महामार्ग अडवण्यात आला आहे. धुळे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी आंदोलक गोळा झाले आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com