Oath Ceremony: महायुतीच्या महाशपथविधीला मोदी-शाहांसह 10 मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; सेलिब्रिटींसह बड्या उद्योजकांचीही हजेरी

Mahayuti Oath Ceremony : आझाद मैदानावर भव्य दिव्य कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला कोण कोण उपस्थित होतं? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने देवेंद्र पर्वाला सुरुवात झालीय. या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, नितीश कुमार, चंद्रबाबू नायडूंसह भाजपच्या 10 राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमाला बडे उद्योजक मुकेश अंबानी, अनिल अंबानी, कुमार मंगलम बिर्ला यांनी उपस्थिती लावली.

एवढंच नाही तर या समारंभासाठी शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपुर, रणविर सिंह यांच्यासह माधुरी दिक्षीत या सिनेतारकांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मोदी आणि शाहांचा उल्लेख केला.यावेळी राज्यपालांनी शिंदेंना थांबवलं. त्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदेंनंतर तिसऱ्या क्रमांकावर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.

आझाद मैदानावरच्या सोहळ्याला भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीचे मुख्यमंत्री एवढंच नाही तर लाडक्या बहीणीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र या सोहळ्याकडे ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँगए्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली. त्याचीही जोरदार चर्चा रंगली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com