Rashtrawadi (SP) News : 'ट्रम्पेट'चं 'तुतारी' हे भाषांतर रद्द; निवडणूक आयोगाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा

Sharad Pawar Group Symbol News : शरद पवार यांनी तुतारी आणि ट्रंपेट या चिन्हाबद्दल निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीवर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला दिलासा देत ट्रंपेटचे तुतारी हे मराठी भाषांतर करण्यावर मनाई केली आहे.

'तुतारी'बाबत आयोगानं महत्वाचा निर्णय दिला आहे. यापुढे ट्रंपेट या चिन्हाचं मराठी भाषांतर तुतारी असं करण्यात येऊ नये, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं निवडणूक आयोगाकडे केलेल्या विनंतीला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असल्याने विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत झालेला गोंधळ यंदा विधानसभा निवडणुकीत टाळता येणार आहे.

'Trumpet' या चिन्हाचं मराठी भाषांतर तुतारी असं करण्यात आलं आहे. हे भाषांतर चुकीचं असून ते रद्द करण्यात यावं. कारण आमच्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस याच्याशी ते जुळत असल्यानं मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. यामुळं लोक चुकून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी Trumpet या चिन्हावरील उमेदवाराला मतदान करत आहेत. म्हणून या चिन्हाचं मराठीतील 'तुतारी' हे भाषांतर रद्द करुन 'ट्रम्पेट' असं करण्यात यावं, अशी मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिलासा देत ट्रंपेटचं तुतारी असं मराठी भाषांतर करण्यावर बंदी घातली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com