Navi Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रो प्रवास स्वस्त, नवे तिकीट दर जाणून घ्या!

Navi Mumbai Metro Fare Rate : नवी मुंबई मेट्रोचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. प्रवासी भाड्यात ३३ टक्के कपात करण्यात आली आहे.

Navi Mumbai Metro Fare : नवी मुंबईतील मेट्रोचा प्रवास आणखी सुखावणारा होणार आहे. प्रवास स्वस्त होणार आहे. मेट्रोच्या प्रवासी भाड्यात ३३ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय सिडकोनं घेतला आहे.

नवी मुंबईतील मेट्रोचा प्रवास आता स्वस्त झाला आहे. तिकीट दरात ३३ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. आता मेट्रोचं किमान भाडं हे १० रुपये असणार आहे. तसेच जास्तीत जास्त भाडं हे ३० रुपये असेल. सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेणधर असा हा नवी मुंबई मेट्रोचा मार्ग आहे. आता या मेट्रोचे तिकीट दर कमी करण्यात आले असून, सिडकोने प्रवाशांना गणेशोत्सवाची भेट दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com