Nashik Rain: नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश्य परिस्थिती, मंदिरं गेली पाण्याखाली
नाशिकमध्ये गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळी झाले आहे. नाशिकच्या रामकुंड, गोदा घाटावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांना पाण्याने वेढा घातला असून मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाकडून सध्या गोदाकाठ परिसरातील दुकानं हलवण्यास सुरुवात केली आहे. नदीला आलेला पूर लक्षात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या ३ ते ४ दिवसांपासून गंगापूर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.