VIDEO : 'एक देश एक निवडणूक' गरजेची, PM Narendra Modi यांचं मोठं विधान

Narendra Modi On One Nation One Election : देशात 'एक देश एक निवडणूक' हे धोरण लागू करणं महत्त्वाचं आहे. तसेच जातीयवाद आणि परिवारवाद यावर देखील पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासाठी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 11 व्या स्वातंत्र्यदिनी भाषण केले. तब्बल एक तासाहून अधिक वेळ भाषण करण्याचा विक्रम देखील त्यांनी केला. दरम्यान विविध मुद्यांवर भाष्य करत यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.

भाषण करताना पंतप्रधान मोदींनी 'एक देश एक निवडणूक' हे धोरण लागू करणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. विकसित भारतासाठी 'वन नेशन वन इलेक्शन' का महत्त्वाचं आहे यावर मोदी सविस्तर बोलले आहेत.

जातियवादावर भाष्य करताना त्यांनी 'धर्मनिरपेक्ष सिव्हिल कोड असावं' असे विधान केले आहे. बांगलादेशातील अराजक्तेवर बोलत मोदींनी 'बांगलादेशात अल्पसंख्याक सुरक्षित रहावे' अशी चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com