Shiv Sena News: निवडणुकीनंतर राऊत ठाकरेंसोबत शिवसेनेत राहणार नाहीत! नारायण राणे यांचं सनसनाटी विधान

Narayan Rane on Sanjay Raut Video: संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी पलटवार केलाय. लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत राहणार नाहीत, असा सनासनाटी दावाही नारायण राणे यांनी केलाय.

सिंधुदुर्ग : संजय राऊत (Sanjay Raut) फसवणूक करणारा माणूस आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्गात (Sindhudurg News Today) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी (Narayan Rane) पलटवार केलाय. लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत राहणार नाहीत, असा सनासनाटी दावाही नारायण राणे यांनी केलाय. संजय राऊत हे जामीनावर बाहेर आहेत, त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवली, अशी घणाघाती टीकाही राणेंनी यावेळी केली. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना संपवण्यासाठी राऊतांचे युक्तिवाद सुरु आहेत, असा टोलाी राणेंनी यावेळी लगावला. संजय राऊत यांना फारसं महत्त्व देऊ नये, असंही यावेळी नारायण राणेंनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com