Sindhudurg : आनंदाची बातमी! नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला; पाहा VIDEO

Napane Waterfall : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील प्रसिद्ध नापणे धबधब्यावर पर्यटकांसाठी काचेचा पूल खुला करण्यात आला आहे. राज्याचे पर्यटनमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते काल या आकर्षक काचेच्या पुलाचं लोकार्पण करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे असलेल्या प्रसिद्ध नापणे धबधब्यावर पर्यटकांसाठी खास काचेचा पूल उभारण्यात आला असून, हा पूल काल राज्याचे पर्यटनमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला.या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण काचेच्या पुलामुळे नापणे धबधबा हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन केंद्र बनेल, असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

पुलाच्या उभारणीमुळे साहसप्रेमी पर्यटकांना धबधब्याचं विहंगम सौंदर्य नव्या अंगानं अनुभवता येणार आहे.या पुलाचं मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आलं असून, सोशल मीडियावरही हे दृश्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. निसर्गरम्य परिसरात उभारलेला पारदर्शक काचेचा पूल पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com