Nanded Lok Sabha Voting News: आणखी एका ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड! नांदेडमधील दुसरी घटना

Nanded Lok Sabha Voting News LIVE: नांदेडच्या निपाणी सावरगाव इथं यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया एक तासापासून खोळंबली होती.

Nanded Lok Sabha Voting News: नांदेडच्या निपाणी सावरगाव इथं यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया एक तासापासून खोळंबली होती. दरम्यान, ही नांदेडमधील दुसरी घटना आहे. याआधी नांदेडच्या माहूर तालुक्यातील टाकळी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडली होती. मागील दीडतापासून इथली इव्हीएम मशीन बंद पडली होती. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया खोळंबल्याचं पाहायला मिळालंय. त्यानंतर आता नांदेडच्या निपाणी सावरगाव इथल्याही मतदान प्रक्रियेवर तांत्रिक बिघाडामुळे फटका बसल्याचं पाहायला मिळालंय. दुपारी ऊन वाढल्यानंतर मतदान करायला येण्यापेक्षा अनेक मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. मात्र यंत्रातील बिघाडामुळे या मतदारांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com