Pune Lok Sabha Election 2024 : निकालाआधीच Murlidhar Mohol यांच्या विजयाचे बॅनर

Murlidhar Mohol News Today | लोकसभेच्या निकालाआधीच पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत.

लोकसभेच्या एक्झिट पोलला संपूर्ण राज्यभरात सुरूवात झालीये. तसंच लोकसभेच्या निकालासाठी अजून तीन दिवस शिल्लक आहेत. अशातच निकालाआधीच पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. आज देशातल्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपतोय. पण पुण्यात निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळण्यात आला आहे. पुण्यातील राजकीय परिस्थिती पाहता मोहोळ यांच्याविरोधात मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे देखील उभे होते. त्यामुळे पुण्यात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com