Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर उलटला, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद; पाहा VIDEO

Container Accident CCTV: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरला भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनर महामार्गावर उलटला. लोणावळ्याजवळ ही घटना घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. एक्स्प्रेस वेवरील किलोमीटर 45 जवळ मालवाहू कंटेनर उलटला होऊन अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा कंटेनर पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना अमृतांजन पुलाजवळील वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला.

या अपघातग्रस्त कंटेनरमध्ये चालकासह दोन मदतनीस प्रवास करत होते. या अपघातामध्ये दोन्ही मदतनीस जखमी झाले आहे. महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान आरआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून कंटेनर अर्ध्या तासात बाजूला काढण्यात आला आहे. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर काही काळ वाहतूक थांबविण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com