मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातग्रस्तांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून आता या महामार्गावर मोफत एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे. अपघात घडल्यानंतर रुग्णाला वैद्यकीय मदत मिळावी यासाठी हि सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सेवेअंतर्गत एक्स्प्रेस वेववर चार ठिकाणी हेलिपॅड बांधण्यात येणार असून अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातात होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. सध्या दरवर्षी सरासरी १०० पेक्षा अधिक जणांचा अपघातात मृत्यू होतो. यात अनेकांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झालेला आहे. आता एअर अॅम्ब्युलन्स सेवेमुळे गंभीर जखमी रुग्णांना तातडीने शहरातील प्रमुख रुग्णालयात हलवता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.