Supriya Sule : ''त्यांना एसओपी करावी लागते हे दुर्दैव .. '' सुप्रिया सुळेंनी साधला भाजपवर निशाणा

Supriya Sule Speaking on 'Ladaki Bahin Yojana' : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांना सबलीकरण करण्यासाठी नाही, तर स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता आहे. हे स्वार्थी सरकार आहे, लोकसभेला अपयश आल्यावर लाडकी बहिण आठवली, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस एसओपी (SOP) करणार आहेत. जाहीरात कशी करायची कोणी करायची ही एसओपी तयार करणार आहेत. एसओपी करावी लागते ही दुर्दैवी बाब आहे, असे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांना सबलीकरण करण्यासाठी नाही, तर स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता आहे. हे स्वार्थी सरकार आहे, लोकसभेला अपयश आल्यावर लाडकी बहिण आठवली. भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा अपमान आहे, असा निशाणा देखील सुप्रिया सुळेंनी महायुती सरकारवर साधला आहे. पवार आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक हे भाजप म्हणत आहे, याचा अर्थ त्यांना परत निवडणूका घ्यायच्या नाहीय का?, भाजपला संविधान बदलायचे आहे हे स्पष्ट आहे. भाजपच्या मनात संविधान बदलण्याचं पाप दिसून येतंय. भाजपचं हे विधान संविधानाच्या विरोधात आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केली. तसेच आमचे सरकार ईडीच्या भितीने पाडले. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी ही योजना काढली आहे. खरंच योजना असती तर श्रेय वाद नसता. कोणाचे सरकार येईल ते जनता ठरवेल, असेही सुप्रिया सुळेंनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com