Bhagavan Gad Dasara Melava : 'गोपीनाथ मुंडेंच्या शब्दावर मी खरी उतरले'- पंकजा मुंडे; भगवानगडावरून भाऊ - बहीणीचं शक्तिप्रदर्शन

Pankaja Munde Speech : गोपीनाथ मुंडे यांच्या शेवटच्या भाषणाचा उल्लेख करत पंकजा मुंडे यांनी मी त्यांच्या शब्दावर खरी उतरले असल्याचं म्हंटलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी शेवटच्या भाषणात मला गडावरुन दिल्ली नाही, मुंबई नाही तर पंकजा मुंडे दिसते असं म्हंटलं आणि मी त्यांच्या शब्दावर खरी उतरले. मी भगवान शक्तीगड उभा केला, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे. पंकजा मुंडे यांनी जातीभेदावर एक शायरी सादर करत आपल्या भाषणाला सुरवात केली. भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगाव घाट येथे दरवर्षी दसरा मेळावा होत असतो. यंदाच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. या दसरा मेळाव्याला बहीण-भाऊ पहिल्यांदाच एकत्र उपस्थित राहिल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शक्तिप्रदर्शन सगळ्यांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी, माझ्या मेळाव्यासाठी 18 पगड जातीचे लोकं महाराष्ट्रभरातून आले आहेत. माझ्या वडीलांनी तुमची जबाबदारी पदरात टाकली आहे. माझा पराभव झाल्यावरही तुम्ही मला जास्त इज्जत दिली. गावा-गावांमध्ये जाऊन मी दौरे करणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे. मी माझ्या ऊसतोड कामगारांचे जीवन बदलल्या शिवाय शांत बसणार नाही, असं म्हंटलं आहे. तर यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांचा उल्लेख गोंडस बाळ म्हणून केला आहे. मी माझ्या मुलाला सांगितले आहे की, मला तुझ्या पेक्षा जास्त जनता प्रिय आहे. माझ्यावर संकट आले तेव्हा माझी जनता माझ्यासोबत उभी राहिली. मी निवडणूक हरले म्हणून पोरांनी जीव दिले यापेक्षा जास्त काय प्रेम असायला हवे, असं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे. महादेव जानकर माझे बंधू आहेत आणि त्यांच्या बाजूला बसलेले गोंडस लेकरू लक्ष्मण हाके असे म्हणत त्यांनी हाके यांचं कौतुक केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com