Marathi News Headlines : रेल्वे मेगाब्लॉक रद्द, पुण्यात ३ दिवस दारूबंदी; वाचा २०-२० हेडलाइन्स, VIDEO

Superfast News in Marathi : गणेशोत्सवाची धूम आणि राज्यभरातील इतर महत्वाचा आढावा २० - २० हेडलाइन्समधून.
  • जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा मयूर महालात विराजमान झाला आहे. दर्शनासाठी रात्रीपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

  • दगडूशेठची भव्य मिरवणूक. बाप्पासाठी सिंहरथ सजला. पताका नाचवत बाप्पाला मानवंदना देण्यात आली.

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. अमित आणि कियानच्या हस्ते पूजा करण्यात आली.

  • संभाजीनगरात ग्रामदैवत संस्थानच्या गणपतीच्या आरतीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले.

  • तळकोकणात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय . मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

  • सोने चांदीच्या गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सुवर्णनगरीत गर्दी बघायला मिळाली. जळगावच्या बाजारपेठेत सोन्याच्या, चांदीच्या गणेश मूर्तीला मोठी मागणी आहे.

  • नागपुरातील स्वयंभू गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. आकर्षक रोषणाईने मंदिर उजळून निघालं.

  • गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचायला मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट आदेश दिले असून, नाचताना दिसून आल्यास कारवाई होणार आहे.

  • मूर्ती दान करा खत मिळवा असे आवाहन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुणेकरांना केलं आहे.

  • शिक्षक भरतीतील सात हजार शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी द्या, असे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. 2019-20 मध्ये TET परीक्षेतल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या राज्य सरकारला कोर्टानं दणका दिला आहे.

  • गणेशोत्सवात चुरमुरे, शेंगदाणा आणि डाळींचे दर वाढले असून, आता बाप्पाच्या प्रसादासाठी 10 ते 20 टक्के जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

  • पुण्यात गणेशोत्सवात 3 दिवस दारूबंदी असून, आज आणि 17-18 सप्टेंबरला ही दारूबंदी असेल. पुणे पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली.

  • लोकलच्या प्रवाशांना गणपती बाप्पा पावला आहे. मुंबई लोकलचा उद्याचा मेगाब्लॉक रद्द कऱण्यात आला आहे. गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • मुंबईत मेट्रो प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात रात्री साडेबारापर्यंत मेट्रो धावणार आहे. गणेश भक्तांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनानं पुढाकार घेतला.

  • गणेशोत्सवात Hyundai Exter च्या दोन नव्या कार लॉन्च झाल्या आहेत. 10 लाखांच्या आत या कार उपलब्ध आहेत, तर सनरूफ आणि सेफ्टीसह अनेक वैशिष्ट्ये आहेत.

  • बँकांनी पैसे कापल्यामुळे सरकार बँकांशी चर्चा करणार आहे. महिला बालविकास मंत्रालय पत्रव्यवहार करणार आहे. तक्रारी आल्यानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com