Solapur News : 'लाडकी बहीण' कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा

Ladaki Bahin Yojna : मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप सकल मराठा समाजाच्या समन्वयक माऊली पवार यांनी केला आहे. त्यामुळे लाडकी बहीण कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोलापूरात होणारा 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिला आहे. माऊली पवार यांनी सरकारला हा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप यावेळी माऊली पवार यांनी केला आहे. त्यामुळे सोलापूरात होणारा 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिला आहे. 25 सप्टेंबरला हा कार्यक्रम सोलापूर येथे होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत.

''मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणावर सकारात्मक तोडगा सरकारने काढला नाही तर सोलपूरमध्ये होणारा लाडकी बहीण कार्यक्रम आम्ही उधळून लावू, आणि मुख्यमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही.'' असा इशारा सकल मराठा समाजाच्या समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com