Dasra Melava : नारायण गडावर जरांगेंचा आवाज घुमणार; दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 12 तारखेला नारायण गडावर दसरा मेळावा घेणार आहेत. त्याची तयारी सध्या मेळाव्याच्या ठिकाणी सुरू आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी जोरात सुरू आहे. 12 तारखेला हा दसरा मेळावा होणार आहे. परंतु, 11 तारखेपासून नारायण गडावर जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शेकडो एकरवर हा दसरा मेळावा होत आहे. याठिकाणी 20 x 20 चं 15 फुट उंच स्टेज देखील उभारण्यात आलं आहे. मेळाव्याच्या ठिकाणी पाणी, डॉक्टर, अॅम्ब्यूलन्स यासारख्या सुविधा देखील तैनात ठेवण्यात येणार आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे बीड जिल्ह्यातील नारायण गडावर यावर्षी दसऱ्याला मेळावा घेणार आहेत. त्यांच्या मेळाव्याला पोलिस प्रशासनाकडून आजपर्यंत परवानगी मिळाली नव्हती. मराठा समाजाने दसऱ्या दिवशी मेळावा घेण्यासाठी पोलिसांकडे रितसर परवानगी मागितली होती. 9 दिवस उलटूनही परवानगी न मिळाल्याने मराठा समाज बांधव आक्रमक झाले होते. अखेर आज पोलिस प्रशासनाकडून मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता याठिकाणी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात हा मेळावा घेतला जाणार असून मेळाव्याच्या अधल्या रात्रीपासूनच मेळाव्याला येणाऱ्या मराठा समाजासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाणी, डॉक्टर, अॅम्ब्यूलन्स अशा सुविधा देखील ठेवण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com