Dharashiv-Beed News : मराठा समाजाची धारशिव आणि बीड बंदची हाक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज मराठा समाजाकडून धारशिव आणि बीडमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. मनोज जरांगे ही पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर आता त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र तरीदेखील सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संतप्त मराठा समाजाने आज धारशिव आणि बीडमध्ये बंदची हाक दिली आहे. त्यामुळे धारशिव आणि बीड जिल्ह्यात सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळत आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बीड आणि धारशिवमधले मराठा आंदोलक अंतरावली सराटीकडे रवाना झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील हे जवळपास वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा देत आहेत. ही त्यांच्या उपोष्णाची सहावी वेळ आहे. शुक्रवारपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र अद्यापही सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताच तोडगा काढलेला नाही. त्यामुळे संतप्त मराठा समाजाने जरांगे यांना समर्थन दर्शवण्यासाठी शनिवारी धारशिव आणि बीडमध्ये बंद पाळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.