VIDEO : या तीन जिल्ह्यात मराठा समाजाचा कडकडीत बंद

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज देखील आक्रमक झालेला दिसून येत आहे. आज मराठा समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज देखील आक्रमक झालेला दिसून येत आहे. अहमदनगर, नांदेड, लातूर या जिल्ह्यात आज मराठा समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेली असताना देखील जरांगे उपोषण मागे घेत नाहीत. तर सरकार मात्र त्यांच्या या उपोषणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. त्यामुळे सोमवारी मराठा समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. मनोज जरांगे यांना समर्थन दर्शवण्यासाठी मराठा समाजाकडून अहमदनगर, लातूर, नांदेड या तिन्ही जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या बंदला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिलेला दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com