VIDEO : '' .. तर मराठ्यांचा कचका कळेल''; जरांगे सरकारवर भडकले !
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. ''आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या, अन्यथा तुम्हाला मराठ्यांचा कचका कळेल. आरक्षण दिलं नाही तर तुमचं राजकीय गणितच बिघडवणार.'' असं जरांगे यांनी म्हंटलं आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे गेल्या वर्षभरापासून लढा देत आहे. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा उपोषण देखील केलं आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी इशारा दिल आहे. ''आरक्षण न देता आचारसंहिता लावायची असा तुमचा विचार असेल तर मराठ्यांना डावलून तुम्हाला सत्ता स्थापन करता येणार नाही. तरीही तुम्हाला तसा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही मराठ्यांचा कचका बघाच. आरक्षण न देताच जर निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या तर माझ्या समाजाचे मुलं मोठे करण्यासाठी मी तुमचं राजकीय गणित बिघडवणारच.'' असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.