VIDEO: 2 बाय 4 ची खोली, हातावरचं पोट, पराकोटीचा संघर्ष तरीही तिने करुन दाखवलं! मोलमजूरी करणाऱ्या मायची लेक PSI झाली..
कोल्हापुरात मनाली शिंदे नावाची तरुणी परिस्थिशी झुंज देत पीएसआय बनली. मनात दृढ इच्छा असेल तर बिकट परिस्थितीशीही झुंज देता येते, हे या तरुणीने दाखवून दिलं. मनालीला वडील नाहीत, यासाठी तीच्या आईनेच मोलमजुरी केली. पराकोटीचा संघर्ष करुन मनालीच्या आईने तिला शिकवलं, मोठ केलं. आईच्या याच कष्टांची जाणीव ठेवत. मनालीने आईचं दुःख कमी करण्याचा निश्चय मनी बाळगला. आणि लाखो तरुणांचं स्वप्न असणारी खडतर परीक्षा पास करुन दाखवली. मनालीच्या या यशामुळे केवळ तिचं कटुंबालाच नव्हे तर अधिकारी बनन्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुण-तरुणींना ध्येय साध्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.