भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची आहे. त्यातच शिंदे गटात मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच सुरु आहे. तर शिंदे गटाला महायुतीत 13-14 मंत्रिपदं मिळणार आहेत. त्यापैकी 10 ते 12 मंत्र्यांना या आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे..त्यापार्श्वभुमीवर हायकमांडने शिंदे गटाच्या इच्छुक मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक मागवलं होतं. त्यात मागील सरकारमधील अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दोन मंत्री नापास तर संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईकांसह 5 नेते पास झाल्याची माहिती शिंदे गटातील वरिष्ठ सुत्रांनी दिलीय.. त्यामुळे शिंदे गटाचे संभाव्य मंत्री कोण आहेत? पाहूयात
1) उदय सामंत
2) दादा भूसे
3) शंभूराजे देसाई
4) गुलाबराव पाटील
5) तानाजी सावंत
6) दिपक केसरकर
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाट
9) प्रताप सरनाईक
10) अर्जून खोतकर
11) विजय शिवतारे
11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. त्यातच आता शिंदे गटातील इच्छुकांच्या प्रगतीपुस्तकामुळे सत्तार, राठोडांसह इतर इच्छुकांचीही धाकधूक वाढलीय... मात्र विस्तारापुर्वी पुन्हा लॉबिंग करून अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दिग्गज नेते मंत्रिपद पटकावणार की त्यांना मंत्रिमंडळाबाहेर राहावं लागणार? याचीच उत्सुकता आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.