ST महामंडळाकडून नववर्षाचे खास गिफ्ट; प्रवाशांना होणार मोठा फायदा, वाचा सविस्तर

st bus news : ST महामंडळाकडून प्रवाशांना नववर्षाचे खास गिफ्ट मिळणार आहे. 1300 हून अधिक गाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. या निर्णयाचा प्रवाशांसहित एसटी महामंडळाला मोठा फायदा होणार आहे.

एसटी महामंडळाने महाराष्ट्रातील जनतेसाठी नववर्षाचे खास गिफ्ट दिलं आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 1300 हून अधिक बसगाड्या ताफ्यात जमा होणार आहेत. गेल्या काही वर्षांत बसगाड्यांच्या कमतरतेमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 11 लाखांची घट झाली आहे. त्याचा तोटा आता भरून निघण्याची शक्यता आहे.

कोव्हिडपूर्वी एसटी महामंडळाच्या ताफ्यात 18,500 बसगाड्या होत्या. त्यापैकी 15,500 बसगाड्या सेवा देत होत्या. त्यावेळी दररोज 65 लाख प्रवासी एसटी बसने प्रवास करत होते. मात्र, कोव्हिडनंतर बसगाड्या खराब होणे आणि नवीन बसगाड्यांची टंचाई यामुळे जवळपास 1,000 बस कमी झाल्या होत्या. त्यामुळे फक्त 14,500 बसगाड्याच सेवा देत होत्या. त्यामुळे प्रवाशांची संख्या 65 लाखांवरून 54 लाखांपर्यंत घटली होती.

बसगाड्यांची टंचाई असल्याने एसटी महामंडळाने अनेक वर्षे तोट्याचा सामना करावा लागला. दोन वर्षांपूर्वी उचललेल्या उपाययोजनांनंतर महामंडळाने आता ताफ्यात भाडेतत्त्वावर 1300 नवीन बसगाड्या सामील करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे मुंबई-पुणे क्षेत्रासह नाशिक-संभाजीनगर आणि नागपूर-अमरावती यासारख्या प्रत्येक विभागासाठी सुमारे 450 बसगाड्या सेवेत समाविष्ट केल्या जाणार आहेत.

नवीन बसगाड्या नवीन वर्षापासून सेवेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला तोटा भरून नफा मिळवण्याची अपेक्षा आहे. याचा लाभ राज्यातील एसटी सेवांचा वापर करणाऱ्या गरीब जनतेलाही होईल. यामुळे प्रवास परवडणारा होईल आणि महागाईचा फटका कमी बसेल. यामुळे एसटी महामंडळाने राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे नववर्षाचे खास गिफ्ट ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com