Maharashtra : EWS आणि BPL वीज ग्राहकांना, २५ वर्ष मोफत वीज मिळणार |VIDEO

Maharashtra SMART Scheme : ५ लाख घरगुती ग्राहकांना २५ वर्ष मोफत वीज मिळणार आहे. EWS आणि BPL ग्राहकांना योजनेचे लाभ घेता येईल. १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ (EWS) आणि दारिद्र्यरेषेखालील (BPL) ग्राहकांसाठी 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप' अर्थात 'स्मार्ट' योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 'पात्र घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना तब्बल पंचवीस वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे'. महावितरणने या योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात केली असून, याचा फायदा महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ५ लाख घरगुती ग्राहकांना होईल. यासाठी सरकारनं ६५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळवण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. ही योजना 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com