Maharashtra Doctors Strike : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण, राज्यभरातील 30 हजार डॉक्टर संपावर! | VIDEO

Satara Doctor Death Case : राज्यभरातील सर्व सरकारी रुग्णालयांमधील सुमारे 30 हजार निवासी डॉक्टर उद्या संपावर जाणार आहेत. यादरम्यान बाह्यरुग्ण सेवा बंद राहतील, पण उर्वरित दाखल रुग्णांवर उपचार सुरू राहणार आहेत.

राज्यभरातील सर्व सरकारी रुग्णालयांमधील सुमारे 30 हजार निवासी डॉक्टर उद्या संपावर जाणार आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करून करावी. कुटुंबाला न्याय मिळावा. कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी आणि राज्यात अशा घटना रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत.अशा मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत. यादरम्यान बाह्यरुग्ण सेवा बंद राहतील, पण उर्वरित दाखल रुग्णांवर उपचार सुरू राहतील आणि आपत्कालीन सेवा देखील सुरू राहतील अशी माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com