Akola New: पोलिस भरतीसाठी निघाले, पण प्रवासातच तारेवरची कसरत! अकोल्यातील Video चर्चेत

Maharashtra Police Recruitment News Today: पोलिस भरतीसाठी निघालेल्या तरुणांची रेल्वे डब्यात चढताना तारेवरची कसरत, रेल्वे प्रशासनाकडे डबे वाढवण्याची विद्यार्थ्यांकडून विनंती

अकोला : पोलिस भरतीसाठी (Police Bharti News) निघालेल्या तरुणांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत या तरुणांना करावी लागत असल्याचं व्हिडीओतून स्पष्टपणे अधोरेखित झालं आहे. अकोला रेल्वे स्थानकातील (Akola Railway Station) हा Videoकमालीचा चर्चेत आला आहे. राज्यभर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु झाली. 19 जूनपासून सुरु झालेल्या या भरतीसाठी निघताना तरुणांना कशाप्रकारे चढाओढ करावी लागते आहे, हे या व्हिडीओतून दिसून आलंय. दरम्यान, जोपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया सुरु आहे, तोवर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होते आहे. त्यासाठी रेल्वेमध्ये अतिरिक्त डबे वाढवावेत, अशी विनंती विद्यार्थ्यांकडून केली जातेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com